शेअर ट्रेडरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:18 IST2019-09-21T06:18:15+5:302019-09-21T06:18:18+5:30

मुलुंड परिसरात इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत ४५ वर्षीय शेअर ट्रेडरने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली.

Stock trader suicide | शेअर ट्रेडरची आत्महत्या

शेअर ट्रेडरची आत्महत्या

मुंबई : मुलुंड परिसरात इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत ४५ वर्षीय शेअर ट्रेडरने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. शेअर मार्केटमधील आर्थिक तोट्यामुळे ते गेल्या सहा महिन्यांपासून तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
मनीष ठक्कर रायमुंगीया (४५) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. मुलुंड पश्चिमेकडील बी.आर. रोड येथील धैवत टॉवरमध्ये मनीष हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचे. या इमारतीत त्यांचे दोन टू बीएचके फ्लॅट आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून स्थानिकांना धक्काच बसला. याबाबत समजताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची वर्दी लागताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Stock trader suicide