‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप
By Admin | Updated: September 19, 2014 03:18 IST2014-09-19T03:18:05+5:302014-09-19T03:18:05+5:30
अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय व चीनसोबतचे व्यापारी संबंध मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली.

‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप
मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय व चीनसोबतचे व्यापारी संबंध मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली. मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 4 महिन्यांतील सर्वात मोठी ङोप घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 481 अंकांच्या उसळीसह 27,112.21 अंकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 139 अंकांनी ङोपावून 8,114.75 अंकावर बंद झाला. विदेशी कोषांच्या मागणीनेही सर्व 12 श्रेणींचा निर्देशांक क्.58 ते 4.65 टक्क्यांनी वधारला.
बीएसईचा 3क् शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह उघडल्यानंतर 26,5क्3.क्8 अंकांवर गेला होता. नंतर यात सुधारणा झाली आणि सेन्सेक्सने 27 हजारांची पातळी ओलांडली. अखेरीस सेन्सेक्स 48क्.92 वा 1.81 टक्क्यांच्या तेजीसह 27,112.21 अंकावर बंद झाला. गेल्या 12 मेनंतर सेन्सेक्समध्ये एका दिवशी झालेली ही सर्वात मोठी उसळी आहे. त्यादिवशी सेन्सेक्स 556.77 अंकांनी उंचावला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा 8,1क्क् अंकांची पातळी गाठली. दिवसभरात निफ्टी 8,12क्.85 अंकांच्या उच्चांकी पातळीला गेला होता. अखेरीस तो 139.25 अंकांच्या तेजीसह 8,114.75 अंकावर बंद झाला. गेल्या 12 मे रोजी निफ्टीने एकाच दिवशी सर्वात मोठी ङोप घेतली होती. त्यादिवशी निफ्टीत 155.45 अंकांची वाढ झाली होती.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हने दोनदिवसीय धोरणात्मक बैठकीत व्याजदर जवळपास शून्याच्या पातळीवर दीर्घ काळार्पयत कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे भारतासह अन्य उभरत्या बाजारापेठांना तात्कालिक दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, भारताने चीनसोबत पाच वर्षासाठी आर्थिक सहकार्य करार केला आहे. यामुळे चीनमधून भारतात 2क् अब्ज डॉलरची गुंतवणूक येणार आहे.
जाईफिन रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवोपम चौधरी यांनी सांगितले की, ‘फेडरलने काल धोरणात्मक आकडेवारी जाहीर केली. यामुळे बाजारातून भांडवल काढून घेण्याच्या चर्चेला ब्रेक लागला.’ हीरो मोटार, एचडीएफसी, टाटा मोटर्स, एलअॅण्डटी, भेल आणि बजाज ऑटो यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. (प्रतिनिधी)
4आनंद राठी फायनान्शिअल सव्र्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवांग मेहता म्हणाले, चीनद्वारा भारताच्या पायाभूत क्षेत्र, रेल्वे व उत्पादन प्रकल्पांत मोठी गुंतवणूक होण्याच्या शक्यतेने बाजारात उत्साह होता. आशियाई बाजारात चीन, सिंगापूर, तैवान आणि जपानमध्ये क्.क्2 ते 1.13 टक्क्यांनी वधारले. हाँगकाँगच्या बाजारात क्.72 टक्के व दक्षिण कोरियाच्या बाजारात क्.85 टक्क्यांची घट झाली.
4सेन्सेक्सचे 3क् पैकी 28 शेअर्स तेजीत राहिले. यामध्ये डॉ. रेड्डीज, टाटा पॉवर, मारुती सुझुकी, एनटीपीसी, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टीसीएस आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. तथापि, इन्फोसिसच्या शेअरमध्ये 1.क्8 टक्क्यांनी घट झाली. हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये क्.58 टक्क्याने घसरण नोंदली गेली.