खंडणीसाठी शेअर ब्रोकरचे अपहरण

By Admin | Updated: December 2, 2014 00:16 IST2014-12-02T00:16:06+5:302014-12-02T00:16:06+5:30

खंडणीसाठी शेअर ब्रोकरचे अपहरण करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मुंबईचे राहणारे असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Stock Broker Abduction for Ransom | खंडणीसाठी शेअर ब्रोकरचे अपहरण

खंडणीसाठी शेअर ब्रोकरचे अपहरण

नवी मुंबई : खंडणीसाठी शेअर ब्रोकरचे अपहरण करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मुंबईचे राहणारे असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खारघर सेक्टर ११ येथे राहणाऱ्या शेअर ब्रोकर (बुकी) सोबत अपहरणाचा हा प्रकार घडला होता. शेअर मार्केटशी संबंध असल्याने ही व्यक्ती श्रीमंत असेल असा अपहरणकर्त्यांचा अंदाज होता. त्यानुसार अपहरणकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी व्यवसायाशी संबंधित कारण सांगून बोलावून त्यांचे अपहरण केले. त्यांना जबर मारहाण करून काळाचौकीतील एका चाळीत डांबून ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी त्यांची पत्नी व भावाला फोनवर धमकावत १४ लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यानुसार शेअर ब्रोकरच्या पत्नीने खारघर पोलीसांत तक्रार दिली होती.
गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे व सहाय्यक आयुक्त रणजित धुर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दरम्यान अपहरणकर्त्यांनी मुंबईत कॉटनग्रीन येथे पत्नीला पैसे घेऊन बोलावले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला होता. परंतु रक्कम घेऊन महिला तेथे आली असता अपहरणकर्त्यांनी या महिलेला मस्जिद बंदर येथे बोलावले. या दरम्यान स्थानकालगत चार हात रस्त्याकिनारी इनोव्हा (एमएच ४३ एबी २१२१) कार घेऊन काही संशयित तरुण उभे होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता इनोव्हा कारमध्ये अपहरण झालेली व्यक्ती डांबून ठेवलेल्या अवस्थेत आढळली. त्यानुसार तिघांनाही अटक केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. तर इतर दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अवघ्या दहा तासांतच लावल्याने शेअर ब्रोकरचे प्राण वाचले. खंडणीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले तिघेही मुंबईचे राहणारे आहेत. त्यापैकी एक व्यक्ती ही मुंबईत पत्रकारितेशी संबंधित असल्याचे समजते. परंतु पोलिसांकडून स्पष्टीकरण झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Stock Broker Abduction for Ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.