एसटीला सवलतींचे ३१९ कोटी मिळणार

By Admin | Updated: March 26, 2015 02:01 IST2015-03-26T02:01:40+5:302015-03-26T02:01:40+5:30

एसटी महामंडळाकडून राज्य शासनाला विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलीपोटी ४८१ कोटी रुपये रक्कम शासनाकडून एसटीला येणे बाकी होती.

STL will get Rs 319 crores | एसटीला सवलतींचे ३१९ कोटी मिळणार

एसटीला सवलतींचे ३१९ कोटी मिळणार

मुंबई : एसटी महामंडळाकडून राज्य शासनाला विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलीपोटी ४८१ कोटी रुपये रक्कम शासनाकडून एसटीला येणे बाकी होती. यातील ३१९ कोटी ४५ लाख रुपये एसटीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी, अंध आणि अपंग, स्वातंत्र्यसैनिक यासह २४ प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात. या सवलती दिल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो. सवलती दिल्यामुळे १,३८६ कोटी रुपये शासनाकडून एसटीला देणे होते. मात्र २0१४-१५ मध्ये प्रथम ५00 कोटी आणि नंतर ४0५ कोटी रुपये रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही रक्कमही अदा करण्यात आली. ऊर्वरीत ४८१ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी होते. आता आणखी ३९१ कोटी ४५ लाख रुपये एसटीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आणखी फक्त ८९ कोटी ५५ लाख रुपये शासनाकडून येणे असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: STL will get Rs 319 crores