Join us
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांनंतरही नोकरीच्या प्रतीक्षेत; ६० ते ७० टक्के मुलामुलींनी मागची नोकरी सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 07:02 IST

या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. निकाल लागल्यानंतर मुंबई मेट्रोने कागदपत्रे पडताळणीचे काम जानेवारी-फेब्रुवारी २०२०मध्ये हाती घेतले.

मुंबई : मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने सप्टेंबर २०१९ मध्ये विविध तांत्रिक पदांकरिता १ हजार ५३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या सर्व पदांची आॅनलाइन परीक्षाही नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. निकाल लागल्यानंतर मुंबई मेट्रोने कागदपत्रे पडताळणीचे काम जानेवारी-फेब्रुवारी २०२०मध्ये हाती घेतले.जून महिन्यात अंतिम यादी जाहीर करण्यात आली. आणि केवळ स्टेशन कंट्रोलर पदाच्या ४१ उमेदवारांचे प्रशिक्षण हैदराबादमध्ये ६ मार्च २०२०पासून सुरू करण्यात आले.मात्र टेक्निशियन ग्रेड-२च्या उमेदवारांना नोकरीबाबत अद्यापही ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारीख प्राप्त झालेली नाही.त्यामुळे सदर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २२ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून टेक्निशियन ग्रेड-२च्या ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारीख मिळालेली नाही. निकाल लागल्यापासून ९ ते १० महिने झाले तरी मुंबई मेट्रोकडून जॉइनिंगच्या तारखेबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.परिणामी यासाठी म्हणजे ग्रेड-२च्या ताटकळत असलेल्या उमेदवारांनी मुंबई मेट्रोशी याबाबत संवाद साधला आणि डिसेंबर २०२०पर्यंत जॉइनिंगची मागणी केली. त्यावेळी ज्याप्रमाणे गरज भासेल त्याप्रमाणे उमेदवारांना बोलावले जाईल, अशी माहिती मुंबई मेट्रोकडून उमेवारांना देण्यात आली.डिसेंबरपर्यंत सामावून घ्या!आता निवड झालेल्या टेक्निशियन ग्रेड-२च्या उमेदवारांपैकी ६० ते ७० टक्के मुलामुलींनी त्यांची मागची नोकरी सोडली आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक आवक बंद आहे. आम्हा सर्व टेक्निशियन ग्रेड-२च्या उमेदवारांना डिसेंबर २०२०पर्यंत जॉइंनिंग द्या; अशी मागणी सदर उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, सूत्रांच्या म्हणण्यानुसार या उमेदवारांचा आकडा ४०० ते ५०० आहे.

टॅग्स :मेट्रो