प्रभागातील मनपाच्या शाळेत मटक्याचा अड्डा

By Admin | Updated: February 16, 2015 23:11 IST2015-02-16T23:11:42+5:302015-02-16T23:11:42+5:30

जेल तलाव, पोलीस वसाहत, मीनाताई ठाकरे चौक, धोबी आळी, सिव्हील हॉस्पिटल, कोर्ट नाका, टेंभी नाका, गीता गणेश सोसायटी चरई, आंबेडकर रोड, उथळसर हा भाग प्रभाग ४१ मध्ये येत आहेत.

Steeple in the Municipal School of the area | प्रभागातील मनपाच्या शाळेत मटक्याचा अड्डा

प्रभागातील मनपाच्या शाळेत मटक्याचा अड्डा

नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदर
जेल तलाव, पोलीस वसाहत, मीनाताई ठाकरे चौक, धोबी आळी, सिव्हील हॉस्पिटल, कोर्ट नाका, टेंभी नाका, गीता गणेश सोसायटी चरई, आंबेडकर रोड, उथळसर हा भाग प्रभाग ४१ मध्ये येत आहेत. आंबेडकरनगर, क्र ांतीनगर, कामगारनगर या झोपडपट्ट्या असलेल्या प्रभागाची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. ४० टक्के झोपडपट्टी व ६० टक्के इमारतींचा प्रभाग आहे. तलावाचे शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराचा उथळसर तलाव बुजवून कामगारनगर झोपडपट्टी वसली आहे़ विशेष म्हणजे उथळसर प्रभाग समितीचे कार्यालय शेजारी असताना हा प्रकार घडलेला आहे. याच कार्यालयासमोर रस्ता अडवून भंगारवाले बसले असतानाही पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. धोबीघाट, आंबेडकररोडवरील आरक्षित जागाही झोपड्यांनी व्यापल्या आहेत. उथळसर मार्केट बेवारस पडले असल्याने काही लोक त्याचा मुतारीसाठी वापर करतात. ज्यांच्यासाठी मार्केट बांधले ते रस्त्यावर धंदा करीत आहेत. मनपाची शाळा क्र मांक ७ ही २०१० ला धोकादायक ठरवून पाडण्यात आली़ ती बांधताना शाळेची मालकी पालिकेकडे नसल्याचे उघड झाले.
नगरपालिका असताना १९६५ मध्ये ही जागा एका गुजराथी ट्रस्ट कडून विकत घेण्यात आली़ परंतु जागा मात्र नावावर करून घेण्यात आली नाही़ त्यामुळे शाळेला बांधकाम परवानगी घेताना कागदपत्रांची पूर्तता करता येत नव्हती. त्या ट्रस्टीना शोधण्याचे काम नगरसेवक महेश वाघ यांना करावे लागत आहे. सद्य सध्या शाळा अर्धवट तोडलेली असल्यामुळे त्याचा फायदा चरस, गांजा, दारूची नशा करणार्यांना होताना दिसून येत आहे. तत्कालीन आमदार मो.दा.जोशी यांनी बांधलेल्या खुला रंगमंचच्या बाजूला मटक्याचा धंदा सुरु आहे़ याबाबत लोकप्रतीनिधिनी तक्रार करूनही कारवाई होत नाही. शासनाने हिंदी भाषिकांसाठी हिन्दीभवन बांधले़ सध्या त्याचा वापर व्यावसायिकपणे न करता राहण्यासाठी करण्यात येत आहे़ यामुळे शासनाच्या मुळ संकल्पनेला हरताळ फासला जात असताना या कडे कोणी लक्ष देताना दिसत नाही. आंबेडकररोड नाल्याचे मजबूतीकरणाचे काम नाल्यावर असलेल्या झोपड्यांमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही.

कामगारनगर वस्तीचे पुनर्वसन बीएसयूपीतून केल्यानंतर जी मोकळी जागा मिळेल त्यातून शाळा, मैदान, हॉस्पिटलसारखी सोय करता येऊ शकणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ९ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करून विकास कामे करण्यात येणार आहे.
- महेश वाघ, नगरसेवक

उथळसर शाळेची जागा एका गुजराथी ट्रस्टच्या नावे असताना ती तोडण्यात आल्याने तेथील मुलांची पालिकेच्या इतर तीन शाळेत सोय करण्यात आली आहे. नवीन शाळा बांधताना जागा मालकाकडून जागा नावे करण्यासाठी मी गुजरातला जाऊन ट्रस्टीचा शोध घेतला आहे. उथळसर मार्केटमध्ये असलेले ओटे तोडून तिथे व्यायामशाळा, वाचनालय करण्याचा प्रयत्न आहे.
- पूजा वाघ, नगरसेविका.

शाळेची जागा पालिकेच्या नावे नसताना ती तोडून पालिकेने स्थानिक मुलांचे शाळेचे नुकसान केले आहे. यामुळे शाळेचा पटदेखील घसरला आहे. याला जबाबदार कोण? शाळा बांधून होईपर्यंत हा पट आणखी खालावणार आहे. याठिकाणी नको ते धंदे चालतात. ते पालिकेने बंद करण्यासाठी शाळेला कुंपण घालणे आवशक आहे.
- संदीप जाधव,
स्थानिक नागरिक

Web Title: Steeple in the Municipal School of the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.