प्रशासकीय भवनात स्टील्ट पार्किंग
By Admin | Updated: December 15, 2014 01:15 IST2014-12-15T01:15:00+5:302014-12-15T01:15:00+5:30
शहरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते.

प्रशासकीय भवनात स्टील्ट पार्किंग
वैभव गायकर, नवी मुंबई
शहरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते. मात्र याच ठिकाणी स्टील्ट पार्किंगचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यात किमान ५० गाड्यांची सोय होणार असून पोलिस ठाण्यासाठीही हक्काची नवी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.
पनवेलमधील जुन्या तहसिल कार्यालयाजवळ नवीन प्रशासकीय भवन तयार होत आहे. ब्रिटीशकालीन जुन्या तहसिल कार्यालयात पनवेल तहसिल, कोषागार, वन विभाग, निबंधक आणि पोलीस ठाणे आदी कार्यालये होती. एवढ्या महत्वाच्या कार्यालयात कामानिमित्त नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता या कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी वर्गाला या ठिकाणची जागा अपुरी पडत होती. तसेच कार्यालयात दररोज येणा-या नागरिकांमुळे याठिकाणी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती.
या सर्वबाबी लक्षात घेता जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्याचा प्रस्ताव प्रस्ताव तयार करण्यात आला . अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर तहसील कार्यालय , कोषागार कार्यालय महसूल प्रबोधिनीतहलविण्यात आले. पोलीस ठाण्याचे देखील स्थलांतर करण्यात आले . मात्र आम्हाला जुन्या पोलीस ठाण्याप्रमाणे जागा देण्यात यावी, अशी मागणी पोलीसांकडून करण्यात आली. त्यानंतर या मागणीचा विचार करून भवनाच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरु वात करण्यात आली.
या ठिकाणी सुरूवातीला पायलींग करण्याचे ठरले. मात्र याठिकाणी बोल्डर लागल्यामुळे साडे तीन मीटर पाया खोदण्यात आला. त्यामुळे खालील जागा स्टील्ट पार्किंग म्हणून वापरण्यात येणार असून किमान ५० वाहने उभी राहतील इतकी क्षमता या ठिकाणी असेल, असे एका अधिका-याने सांगितले.