सायन रुग्णालयाच्या वसतिगृहातून चोरी

By Admin | Updated: November 15, 2014 01:42 IST2014-11-15T01:42:52+5:302014-11-15T01:42:52+5:30

महापालिकेच्या प्रमुख 3 रुग्णालयांमध्ये वॉर्डमधून काही चोरी होणो, रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टराला मारहाण होणो या नवीन गोष्टी नाहीत.

Steal from Sion Hospital hostel | सायन रुग्णालयाच्या वसतिगृहातून चोरी

सायन रुग्णालयाच्या वसतिगृहातून चोरी

पूजा दामले  ल्ल मुंबई
महापालिकेच्या प्रमुख 3 रुग्णालयांमध्ये वॉर्डमधून काही चोरी होणो, रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टराला मारहाण होणो या नवीन गोष्टी नाहीत. सुरक्षेचा अभाव असल्यामुळेच अशा घटना या रुग्णालयांमध्ये वारंवार घडत असतात. आता सायन रुग्णालयाच्या नवीन निवासी वैद्यकीय वसतिगृहामधून गुरूवारी सुमारे दीड लाख किंमतीचा माल चोरीला गेल्याची घटना घडली. सायन रुग्णालयातही सुरक्षा रक्षक नसल्याने हा प्रकार घडला आहे. एकूणच अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही, हेच या घटनेतून समोर आले आहे. 
सायन रुग्णालय परिसरामध्ये निवासी डॉक्टरांसाठी एक वसतिगृह आहे. दुसरे वसतिगृह हे नवीन बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर आहे. तर रुग्णालय परिसराच्या बाहेर एक किमीच्या अंतरावर 7 मजली नवीन निवासी वैद्यकीय अधिका:यांसाठी (आरएमो) वसतिगृह बांधण्यात आले आहे.  या इमारतीच्या पहिल्या 5 मजल्यांवर 6क् खोल्या आणि सहाव्या आणि सातव्या मजल्यावर 48 खोल्या आहेत. बॅरेकच्या परिसरातच ही इमारत आहे. या परिसरामध्ये सुरक्षारक्षक नसल्यामुळे आजुबाजूच्या परिसरात राहणा:या रहिवाशांची रहदारी सुरू असते. काही महिन्यांपूर्वीच या इमारतीमध्ये निवासी डॉक्टरांना राहण्यास पाठवले आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील खोली क्रमांक 7क्5, 7क्6, 7क्7 आणि 715 मधून 2 लॅपटॉप, 2 मोबाईल, नवीन कपडे आणि काही किंमती वस्तूंची चोरी झाली. संध्याकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सायन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. 7 या खोल्यांमध्ये अनेस्थिशियाचा 1, पीएसएमचे 2 व सुपर स्पेशालिटीचा 1 डॉक्टर राहतो. बॅरेकमध्ये येण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मात्र, इथे कधीच सुरक्षारक्षक नसतो. याआधीही या परिसरातून लहान गोष्टींची चोरी व्हायची. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडे सुरक्षा रक्षकांची मागणी केली होती. सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्यामुळेच येथे सुरक्षारक्षक ठेवण्यात आला नव्हता. रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे निवासी डॉक्टरांना याचा फटका बसला आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर अजूनही काही काम चालू आहे. यामुळे येथे काम करणा:या कामगारांनीच चोरी केली असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला असल्याचे सूत्रंकडून समजते आहे.
 
चोरी प्रकरणाच्या संदर्भात मुख्य सुरक्षारक्षकांशी डॉक्टरांची चर्चा झाली आहे. सध्या या इमारतीसाठी आणि बॅरेकच्या प्रवेशद्वारांशी सुरक्षारक्षक नेमला आहे. पुढच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यापुढे अशी घटना घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

 

Web Title: Steal from Sion Hospital hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.