महिलेचे अश्लील फोटो ठेवले स्टेट्सला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:17 AM2020-12-04T04:17:51+5:302020-12-04T04:17:51+5:30

महिलेची पोलिसांत धाव, कुलाबा येथील घटना पीडितेची पोलिसांत धाव, कुलाबा येथील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुलाबा परिसरात ...

States placed pornographic photos of the woman | महिलेचे अश्लील फोटो ठेवले स्टेट्सला

महिलेचे अश्लील फोटो ठेवले स्टेट्सला

Next

महिलेची पोलिसांत धाव, कुलाबा येथील घटना

पीडितेची पोलिसांत धाव, कुलाबा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा परिसरात राहणाऱ्या महिलेचे अश्लील फोटो थेट स्टे्टसला ठेवणे तरुणाला भलतेच महागात पडले आहे. महिलेला ही बाब समजताच तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही ३१ वर्षीय तक्रारदार महिला कुलाबा परिसरात राहण्यास आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडाळा परिसरात राहणाऱ्या बिलाल शेख (३२) या तरुणाने त्यांचे खासगी फ़ोटो व्हॉट्सॲपवर स्टेट्सला ठेवले. २७ नोव्हेबर रोजी ही बाब लक्षात येताच, महिलेने याबाबत कुलाबा पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी घाटकोपरमध्ये अशाच प्रकारे विवाहित महिला आणि तिच्या पतीसोबतचे नग्न अवस्थेतील फोटो, व्हिडीओ काढून, तिला धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात, महिलेच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत हे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पुढे तिच्या गळ्यातील मंगळसूत्रासह जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज हिसकावला. याप्रकरणी महिलेने पंतनगर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला असून बुधवारी राम जियावन भवानीप्रसाद वर्मा या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: States placed pornographic photos of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.