राज्याच्या दोन योजना उत्तर प्रदेश राबविणार
By Admin | Updated: May 30, 2017 04:07 IST2017-05-30T04:07:05+5:302017-05-30T04:07:05+5:30
सवलतीच्या दरात सॅनिेटरी नॅपकीन देणारी अस्मिता योजना आणि शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज देणारी सुमतीबाई सुकळीकर

राज्याच्या दोन योजना उत्तर प्रदेश राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सवलतीच्या दरात सॅनिेटरी नॅपकीन देणारी अस्मिता योजना आणि शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज देणारी सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण अशा दोन योजना उत्तर प्रदेश सरकार राबविणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री रिटा बहूगुणा यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. बलात्कार, बालकांवरील अत्याचार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्रात असलेल्या मनोधैर्य योजनेतील अर्थसहाय्य वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती मुंडे यांनी दिली.