युतीने राज्य कंगाल केले होते, आताही तेच करतील

By Admin | Updated: September 19, 2014 02:29 IST2014-09-19T02:29:06+5:302014-09-19T02:29:06+5:30

तिजोरीत खडखडाट असलेले राज्य आम्हाला युतीकडून मिळालेले होते पण आम्ही गेल्या 15 वर्षात विकासाची प्रचंड कामे केली.

The state was poor after the war, they will do the same now | युतीने राज्य कंगाल केले होते, आताही तेच करतील

युतीने राज्य कंगाल केले होते, आताही तेच करतील

यदु जोशी - मुंबई
तिजोरीत खडखडाट असलेले राज्य आम्हाला युतीकडून मिळालेले होते पण आम्ही गेल्या 15 वर्षात विकासाची प्रचंड कामे केली. ही कामेच यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या प्रचाराचे मुख्य अस्र असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.  ई-गव्हर्नन्स, राज्यात उभारलेल्या पायाभूत सुविधा, राजीव गांधी जीवनदायी योजनेने लाखो लोकांना जीवनदान दिले. शिक्षकांच्या भरतीसाठी टीईटी सुरू करून गुणवत्तेचा आग्रह धरण्यात आला. ब्रिटीश कौन्सिलच्या सहकार्याने 7क् हजार शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात आले. हजारो नालाबांध बंधा:यांमुळे दुष्काळावर कायमस्वरुपी मात करता आली. एमपीएससीचा कारभार पारदर्शक केला आणि एमपीएससी उत्तीर्ण सर्व अधिका:यांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी घेणो सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय वाढला, आदी उपलब्धींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत केला.
प्रश्न - निवडणूक आपण कोणत्या मुद्यावर लढणार आहात?
मुख्यमंत्री - आम्ही केलेली कामे लोकांसमोर मांडू आणि आता देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर असताना पुढील पाच वर्षात जगाशी स्पर्धा करू शकेल, असा सक्षम महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. रोजगाराला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील आणि त्यासाठी ‘नॉलेज बेस्ड् इकॉनॉमी’ आम्हाला आणायची आहे. 
प्रश्न - भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र, अशी घोषणा दिली आहे. आपले प्रत्युत्तर काय?
मुख्यमंत्री - ते दिवास्वप्न पाहत आहेत. 
प्रश्न - आघाडी सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय लोकांर्पयत पोहोचविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला असे नाही का वाटत?
मुख्यमंत्री - काहीसा कमी पडला हे खरे आहे पण अलिकडे आम्ही सरकारी योजनांची चांगली प्रसिद्धी केली आहे. 
प्रश्न -मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा भुषवायला आपल्याला आवडेल का?
मुख्यमंत्री - महाराष्ट्रासारख्या महत्त्वपूर्ण राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळावे, असे कुणालाही वाटेल. आघाडीचे सरकार पुन्हा येईल, असा माझा विश्वास आहे.  
 
1995 ते 99 या काळात भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने राज्यावर कर्जाचा अनाठायी बोजा टाकला, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता आणि राज्य कंगाल करण्यात आले. हे पुन्हा सत्तेत आले तर तेच घडेल याची मतदारांना जाणीव असल्याने ते पुन्हा आघाडी सरकारलाच संधी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 
 
राज्यात मोदी लाट नाही
मोठमोठी स्वप्ने दाखवून, गुजरातच्या विकासाचे आकडे फुगवून मोदी सत्तेत आले. पण गेल्या 1क्क् दिवसांत लोकांची अपेक्षापूर्ती होवू शकलेली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार वेगवेगळा विचार करतात हे पोटनिवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार हाच विचार करतील, असा माझा विश्वास आहे. 

 

Web Title: The state was poor after the war, they will do the same now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.