राष्ट्रवादीला प्रदेश उपाध्यक्षांचा राम-राम

By Admin | Updated: September 16, 2014 03:00 IST2014-09-16T03:00:51+5:302014-09-16T03:00:51+5:30

गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीत असलेल्या वाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले.

State Vice President Ram-Ram of NCP | राष्ट्रवादीला प्रदेश उपाध्यक्षांचा राम-राम

राष्ट्रवादीला प्रदेश उपाध्यक्षांचा राम-राम

मुंबई : गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचारांपासून भरकटत असल्याची टीका करत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी वयाच्या 7क्व्या वर्षी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीत असलेल्या वाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेत वाणी यांनी कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करणो टाळले असले, तरी त्यांनी थेट पक्षाच्या विचारसरणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
पक्षाने इशरत जहाप्रकरणी कोणताही तपास होण्याआधी ती निदरेष असल्याची री ओढणो, किंवा पुण्यातील मुस्लीम तरुणाच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवणो, अशा विविध प्रकरणांमुळे निराश झाल्याचे वक्तव्य वाणी यांनी केले. (प्रतिनिधी)
 
कोणत्याही पक्षात प्रवेश नाही
अद्यापही कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचेही वाणी यांनी सांगितले. राष्ट्रवादीत सोमवारी प्रवेश केलेले सातही आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचेच बंडखोर आमदार आहेत. त्यामुळे ‘ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात’ केल्याने फरक पडत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी राष्ट्रवादीला लगावली.

 

Web Title: State Vice President Ram-Ram of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.