Join us

भाडे वाढीनंतर युपीआयच्या माध्यमातून एसटीची कमाई वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 22:08 IST

-चिल्लर वरून वाद टाळण्यासाठी युपीआयचा पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने गेल्या आठ दिवसामध्ये युपीआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तिकीट महसूलमधून ८ कोटी ७० लाख इतकी रक्कम मिळविली आहे. त्यामध्ये भाडेवाढीनंतर युपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीसाठी सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. एकीकडे भाडेवाढीमुळे चिल्लरवरून वाद होण्याची लक्षणे असताना एसटीच्या तिकीट खरेदीसाठी युपीआयचा पर्याय सोयीचा ठरत आहे.

एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये भाडेवाढ १ रुपयाच्या पटीत करण्यात आल्याने नव्या तिकीट दरामुळे सुट्ट्या पैशांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी महामंडळाकडून कंडक्टरकडे १०० रुपयांची चिल्लर ऍडव्हान्स देण्यात येत आहे. त्यासोबतच युपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आलस्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एसटी भाडेवाढ झाल्या पासून युपीआयच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली असून प्रवाशांना सुट्ट्या पैशांसाठी कंडक्टरसोबत वाद घालण्याची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शासनाने एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिकिटाच्या नव्या दराप्रमाणे फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि हाफ तिकीट ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१, ५६ असे झाले आहे. पूर्वी भाडे पाच रुपयांच्या पटीत होते. ते नवीन भाडेवाढीमध्ये एक रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे

गेल्या आठ दिवसांमधे मिळालेला महसूलदिनांक ( जानेवारी ) - महसूलभाडेवाढी पूर्वी युपीआय महसूल२१ - ८७ लाख ५८ हजार ६०२२ - ८६ लाख ५० हजार ९०५२३ - ८४ लाख २३ हजार २५२४ -६७ लाख ९६ हजार १८

भाडेवाढी नंतर युपीआय महसूल२६ - १ कोटी ५३ लाख ५ हजार ८६४२७ - १ कोटी ४६ लाख ४ हजार २७२२८ -१ कोटी २५ लाख १८ हजार ८३२९ - १ कोटी १९ लाख ८२ हजार ८४१

टॅग्स :एसटी