उद्या राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय एकता दौड’

By Admin | Updated: October 30, 2014 01:09 IST2014-10-30T01:09:47+5:302014-10-30T01:09:47+5:30

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणा:या राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय एकता दौड’च्या आयोजनाचा पहिला मान मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाला आहे.

State Level 'National Integration Jog' tomorrow | उद्या राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय एकता दौड’

उद्या राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय एकता दौड’

मुंबई : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणा:या राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय एकता दौड’च्या आयोजनाचा पहिला मान मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाला आहे. शुक्रवारी पार पडणा:या या एकता दौडची सुरुवात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
राज्याच्या पहिल्याच एकता दौडचा मान राज्याच्या कारभाराचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबईला मिळाला आहे. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे या दौडला हिरवा कंदील दाखवतील. मरीन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंटपासून सकाळी 8 वाजता दौडला सुरुवात होणार असून पारशी जिमखाना येथे दौडची सांगता होईल. सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेल्या दौडचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शहरातील सर्व आमदार आणि खासदारांना पाठवल्याचे उपजिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले. पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई शहरातील सर्व नगरसेवक, राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त, महापौर, राज्यसभा सदस्य आणि काही प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात अजरुन पुरस्कार आणि छत्रपती पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे.’
 
वांद्रे येथेही एकता दौड
च् सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून देशभर साजरा होत आहे. महाराष्ट्र शासनही हा एकता दिन साजरा करीत असून या दिवशी   वांद्रे (प.) येथील बँडस्टँड येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली आहे.

 

Web Title: State Level 'National Integration Jog' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.