राज्य सरकारची बेस्टला आर्थिक मदत?

By Admin | Updated: December 21, 2014 01:12 IST2014-12-21T01:12:43+5:302014-12-21T01:12:43+5:30

आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमात अच्छे दिन आणण्याचे संकेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिले़

State Government's best financial help? | राज्य सरकारची बेस्टला आर्थिक मदत?

राज्य सरकारची बेस्टला आर्थिक मदत?

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमात अच्छे दिन आणण्याचे संकेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिले़ त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरही संभाव्य बेस्ट भाडेवाढीतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे़
२००० ते २०१० या दहा वर्षांमध्ये भाडेवाढ न केल्यामुळे बेस्ट उपक्रम साडेतीन हजार कोटींच्या तुटीत आहे़ ही तूट भरून काढण्यासाठी फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ मध्ये भाडेवाढ करण्याचा बेस्टचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीमध्ये मंजूर झाला़ त्यामुळे पुढच्या वर्षीपासून मुंबईकरांना किमान दोन रुपये भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे़
ही भाडेवाढ रद्द करण्यासाठी बेस्टने पालिकेकडून दीडशे कोटी रुपयांचे अनुदान मागितले होते़ परंतु स्थायी समिती अध्यक्ष यशोधर
फणसे यांनी एमएमआरडीएकडे जाण्याचा सल्ला देत बेस्टच्या
जखमेवर मीठ चोळले होते़
शिवसेनेने कानाडोळा केला तरी पुन्हा नव्याने मित्र बनलेल्या भाजपाने बेस्टसाठी चांगला निर्णय घेण्याचे संकेत आज दिले़
सरकारने मदत का करावी?
बेस्ट उपक्रमाकडून पोषण अधिभार, टोल टॅक्स सरकारकडे द्यावा लागतो़ डिझेलसाठी बेस्टला अनुदानही नाही़ त्याचबरोबर सवलतीच्या दरात तिकीट देण्यासाठी बेस्टवर करोडोंचा वार्षिक बोजा
पडतो़ (प्रतिनिधी)

अधिवेशनानंतर
ठरणार भवितव्य
ताडदेव येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या सहकारमहर्षी वसंतदादा पाटील उद्यानाचा लोकार्पण सोहळ्यात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली़ मात्र हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला़

 

Web Title: State Government's best financial help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.