Join us  

राज्यात थंडी स्थिरावतेय, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान ढगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:55 AM

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून समुद्र किनाऱ्यावरील हवामान ढगाळ नोंदविण्यात येत असून, मुंबईकरांनीही रविवारी या ढगाळ हवामानाचा प्रयत्य घेतला. दुसरीकडे विलंबाने का होईना, थंडी नुकतेच राज्यात स्थिरावत असून, रविवारी सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे १५.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान वेंगुर्ला येथे ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढझाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचितवाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आलेआहे. विशेष म्हणजे, थंडी स्थिरावतानाच सर्वत्र सरासरी कमाल तापमानाची नोंद ३०, तर समुद्र किनारी ३३ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद होत आहे.मुंबईचे तापमान २२ अंशावर!मुंबईचा विचार करता मुंबईचे किमान तापमान २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी, राज्यातील बहुतांशी शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात मुंबईच्या किमान तापमानात मात्र थंडीसाठीचे अपेक्षित तापमान नोंदविण्यात येत नसल्याचे चित्र आहे.राज्यासाठी अंदाज२ ते ४ डिसेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.४ डिसेंबर : महाराष्ट्राच्या किनारी सोसाट्याचा वारा वाहील.५ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईसाठी अंदाज : २ आणि ३ डिसेंबर : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २४ अंशाच्या आसपास राहील.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र