Join us

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ५ टक्के वाढीव महागाई भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:58 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी घेतला.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी घेतला. हा भत्ता आता १२ टक्क्यांवरून १७ टक्के इतका करण्यात आला आहे. ही वाढ १ डिसेंबर २०१९ पासून रोखीने देण्यात येईल. वाढ १ जुलै २०१९ पासून लागू केली असली तरी जुलै ते नोव्हेंबरपर्यंतची थकबाकी देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांची थकबाकी देण्याबाबतचा आदेशही तातडीने काढावा अशी मागणी केली आहे.