राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:08 IST2020-12-31T04:08:20+5:302020-12-31T04:08:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाचे ४ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १८ ...

In the state, the cure rate of carina is 94.62 percent | राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के

राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाचे ४ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १८ लाख २४ हजार ९३४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळानंतर वर्षाच्या अखेरीस दैनंदिन रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के झाले असून, मृत्युदर २.५६ टक्के आहे.

सध्या ५३,०६६ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात ३,५३७ रुग्ण आणि ७० मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १९ लाख २८ हजार ६०३ झाली असून मृतांचा आकडा ४९,४६३ झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८० हजार ६८२ व्यक्ती घरगुती तर ३ हजार १२७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

.......................

Web Title: In the state, the cure rate of carina is 94.62 percent