राज्यात दिवसभरात १३ हजार कोरोना रूग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST2021-07-17T04:06:49+5:302021-07-17T04:06:49+5:30
शुक्रवारी ७,६०३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद : ५३ रुग्णांचा मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्ण बरे ...

राज्यात दिवसभरात १३ हजार कोरोना रूग्ण झाले बरे
शुक्रवारी ७,६०३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद : ५३ रुग्णांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, १३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के आहे. आता राज्यात १ लाख १ हजार ३३७ सक्रिय रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर ४,५७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.