अपूर्णावस्थेतील आंबिवली पादचारी पूल सुरू, काम पूर्ण होण्याआधीच पूल खुला करण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:34 AM2017-11-22T05:34:34+5:302017-11-22T05:34:51+5:30

मालाड येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत आंबिवली स्थानकातील एकमेव पादचारी पूल अपूर्णावस्थेत असतानादेखील खुला केला आहे.

Starting the unfurnished pedestrian pedestrian bridge, the work was completed before the completion of the bridge | अपूर्णावस्थेतील आंबिवली पादचारी पूल सुरू, काम पूर्ण होण्याआधीच पूल खुला करण्याची घाई

अपूर्णावस्थेतील आंबिवली पादचारी पूल सुरू, काम पूर्ण होण्याआधीच पूल खुला करण्याची घाई

Next

मुंबई : मालाड येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत, आंबिवली स्थानकातील एकमेव पादचारी पूल अपूर्णावस्थेत असतानादेखील खुला केला आहे. अपूर्णावस्थेतील पूल खुला करणे हे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. यामुळे स्थानिकांसह प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी १५ दिवसांसाठी पूल बंद केला होता. मात्र, मुदत पूर्ण होण्याआधीच अपूर्णावस्थेतील पादचारी पूल रेल्वे प्रशासनाने खुला करण्याची का घाई केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे काम पूर्ण झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
आंबिवली स्थानकात कल्याण दिशेला एकमेव पादचारी पूल आहे. स्थानकातील हा पादचारी पूल ७ नोव्हेंबरला बंद करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीसाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परिणामी, हा पूल २२ नोव्हेंबर रोजी वापरासाठी खुला करण्यात येणार होता. मात्र, तो १९ नोव्हेंबरलाच वापरासाठी खुला करण्यात आला.
शनिवारी मालाड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रविवारी त्वरित रेल्वे प्रशासनाने हा पूल खुला केला. पुलाच्या पश्चिमेकडील रस्त्याला जोडणाºया जिन्याचे काम अपूर्ण आहे, तसेच पूर्वेकडेदेखील फलाट आणि मुख्य रस्त्याला जोडणारा जिना असून, त्याचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडे मुदत असतानादेखील हा पूल का सुरू केला, असा प्रश्न कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे आंबिवली स्थानक प्रतिनिधी संदीप पाटील यांनी उपस्थित केला .
>लाद्यांचे काम अर्धवट
स्थानकाच्या पश्चिमेकडील जिन्यांवरील लाद्यांचे काम अपूर्णावस्थेत आहे. पायºयांवर सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी कवचदेखील उखडले आहेत. पायºयांवरील लाद्या तुटल्या आहेत. पुलावर सुरक्षिततेसाठी पत्रे उभारण्यात आलेले नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
>आता ५० टन क्षमतेचा पादचारी पूल
आंबिवली स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या कामाला लष्कराकडून जोमाने सुरुवात झाली आहे. हा पादचारी पूल दोन महिन्यांत प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. आंबिवली स्थानकातील या नव्या पुलासाठी लष्कराचे ३९ जवान दाखल झाले आहेत.
पुलाच्या देखरेखीची जबाबदारी लष्कराचे मेजर अमित मिश्रा यांच्यावर आहे. हा पूल कसारा दिशेला उभारण्यात येणार आहे. याची प्रस्तावित लांबी १८.२९ मीटर असून रूंदी ५ मीटर असेल.हा नवीन पूल ५० टन वजन पेलू शकेल.
>वेळेच्या मर्यादेआधी काम पूर्ण
७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आंबिवली येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम होणार होते. मात्र, २ दिवसांआधी हे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे.
- ए. के. जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Starting the unfurnished pedestrian pedestrian bridge, the work was completed before the completion of the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई