पुण्यातूनच जडणखडणीला सुरवात...
By Admin | Updated: June 3, 2014 22:05 IST2014-06-03T20:19:35+5:302014-06-03T22:05:49+5:30
कॉलेज जीवनातच पतीत पावन संघटनेचे संस्थापक जनाभाऊ पेंडणेकर यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे, भीमराव बडदे, अनिल शिरोळे व मी स्वत: कामाला सुरवात केली.

पुण्यातूनच जडणखडणीला सुरवात...
पुण्यातूनच लोकनेत्यांची जडणघडण...
'गोपीनाथ मुंडे नावाचे एक उमदा तरूण शिक्षणासाठी पुण्यात आला. कॉलेज जीवनातच पतीत पावन संघटनेचे संस्थापक जनाभाऊ पेंडणेकर यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे, भीमराव बडदे, अनिल शिरोळे व मी स्वत: कामाला सुरवात केली. त्यानंतर वसंतराव भागवत यांनी जनसंघाचे पूर्णवेळ काम करण्याचे आवाहन केले. त्यावेळी मुंडे यांनी पुढे येवून संघाच्या कामाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. अन् पुण्यातूनच कार्यकर्ता ते लोकनेता असा त्यांचा प्रवास सुरू झाला. १९७१ ते १९७५ या काळात विविध आंदोलनात सहभाग घेतला. आणाबाणीच्या काळात आंदोलनामुळे त्यांना तुरुंगवास झाला. मुंडे यांची लोकनेते होण्याच्या दिशेने पुण्यातूनच जडणघडण झाली. केवळ बीडचे नेते न राहता ते राज्याचे लोकनेते झाले. लोकसभेच्या सत्ता परिवर्तनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.'
- माजी खासदार प्रदीप रावत.
दलित कार्यकर्त्याला केले मंत्री...
'राज्यातील गोरगरीब, दलित, मागासवर्गीय व अदिवासी समाजाला न्याय देण्याचे काम मुंडे यांनी आयुष्यभर केले. या लोकनेत्यांने भाजपाला बहुजन चेहरा दिल्यामुळेच विविध मागासवर्गीय जाती-जमातीचे कार्यकर्ते पक्षात दिसत आहेत. माझ्या सारख्या १० बाय १० च्या खोलीत राहणारा कार्यकर्ता त्यांच्याकडे पीएमपी सदस्य पदाची मागणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांनी डबक्यात पोहू नको, तुला समुद्रात नेहतो, असे सांगितले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतून तिकीट देवून निवडून आणले. अन् अनपेक्षितपणे मला मंत्री करून दिलेला शब्द सत्यात उतरविला. १९८६ ला प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी कासेवाडीतील लहुजी वस्ताद शाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अन् कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचा संदेश दिला.'
- माजी मंत्री दिलीप कांबळे.
मुंडेचे पुण्याशी वेगळे नाते...
शिक्षणासाठी आल्याने मुंडे यांची पुणे कर्मभूमी बनली. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विरोध म्हणूनही पुण्याशी त्यांचे वेगळे नाते होते. संघर्षयात्रेलाही त्यांनी पुण्यातील शिवनेरीवरून सुरवात केली. त्यांना मानणारे हजोरो कार्यकर्ते येथे आहेत. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात पुण्यात आल्यानंतर ते हमखास छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या घरी जायचे. कार्यकर्त्यांना जोडणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी उभ्या आयुष्यात केले.
- माजी शहराध्यक्ष विजय काळे.
'गोपीनाथ मुंडे हे भाजपाचा बहुजन चेहरा होता. भाजपाबरोबर सेना, आरपीआय व राष्ट्रीय समाजपक्षांना बरोबर आणून महायुती करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. खडकवासला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता.'
- आमदार भीमराव तापकीर.