Join us  

व्हिसा सेंटर्समध्‍ये कामाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 7:08 PM

कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी देशातील काही शहरांत निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये मर्यादित स्‍वरूपात कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.  

 

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी देशातील काही शहरांत निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये मर्यादित स्‍वरूपात कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.  बेलारूस, डेन्‍मार्क, डोमिनिकन रिपब्लिक, आयर्लंड, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, दक्षिण कोरिया, तुर्की, युएई आणि युनायटेड किंग्‍डम येथील व्हिसा विभागांसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. भारतातील संबंधित एम्‍बॅसीस/ कॉन्‍सुलेट्सच्‍या मान्‍यतेसह आणि आरोग्‍य व सुरक्षितता विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्‍यासह मर्यादित शहरांमधील व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्स पुन्‍हा सुरू करत आहे.  संबंधित एम्‍बॅसीस/ कॉन्‍सुलेट्स, तसेच स्‍थानिक अधिका-यांनी मान्‍यता दिल्‍यानंतर विशिष्‍ट शहरांमध्‍ये निवडक देश व व्हिसा विभागांसाठी व्हिसा अर्ज स्‍वीकारतील. 

ग्राहकांना व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्सना भेट देण्‍यापूर्वी  संकेतस्‍थळाच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन अपॉइण्‍टमेंट बुक करणे अनिवार्य असेल. युके व्हिसा सेवा भारतातील ११ शहरांसोबत दक्षिण आशियामधील मर्यादित ठिकाणी सुरू होत आहे. भारतातील ११ शहरांमधील प्रवासी ६ जुलै पासून युके व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये त्‍यांचे व्हिसा अर्ज सादर करू शकतात.  सुरूवातीला ऑप्‍शनल प्रायोरिटी व्हिसा, सुपर प्रायोरिटी व्हिसा आणि वॉक-इन-सर्विसेसची सेवा देण्‍यात येणार नाही.मुंबई (फक्‍त महालक्ष्‍मी) व देशात अहमदाबाद, बेंगळुरू,  चंदिगड, चेन्नई, जालंधर, कोची, हैद्राबाद, कोलकाता,  नवी दिल्‍ली आणि पुणे या ११ शहरांमधील निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये युके व्हिसा आणि इमिग्रेशन सेवा पुन्‍हा सुरू होत आहे. 

लखनऊ, गोवा, जयपूर, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स सेंटर, दिल्‍लीमधील गुरगाव, बेंगळुरूमधील इलेक्‍ट्रॉनिक सिटी व व्‍हाईटफिल्‍ड सेंटर्स या शहरांमधील सेंटर्स बंद राहतील. व्हिसा अर्जासंदर्भात निर्णय घेण्‍यात आला असेल तर  पासपोर्ट वितरित करण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यात येईल.  पूर्वीच्‍या अपॉइण्‍टमेंटवेळी उपस्थित राहू न शकलेल्‍या ग्राहकांना नवीन अपॉइण्‍टमेंट बुक करण्‍यासाठी त्‍यांच्‍या अकाऊंटमध्‍ये लॉग इन करण्‍याची सुविधा देण्‍यात येईल. 

टॅग्स :व्हिसालॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्या