अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेगा लसीकरण केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:08 IST2021-04-30T04:08:09+5:302021-04-30T04:08:09+5:30

आमदार अमित साटम यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई -सध्या लसीकरणासाठी पश्चिम उपनगरात लांबच लांब रांगा लागत ...

Start a mega vaccination center at Andheri Sports Complex | अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेगा लसीकरण केंद्र सुरू करा

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेगा लसीकरण केंद्र सुरू करा

आमदार अमित साटम यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई -सध्या लसीकरणासाठी पश्चिम उपनगरात लांबच लांब रांगा लागत आहेत. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होऊ नये आणि लसीकरण प्रक्रिया सुलभ पार पडावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स) येथे मेगा लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

येथे मोठ्या प्रमाणात जागा असून, लसीकरणासाठी मोठे हॉल, खोल्या, शाैचालय, स्वच्छतागृह आदी सुविधा आहेत, त्यामुळे येथे मेगा लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या आपल्या मागणीचा पालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आमदार साटम यांनी पालिका आयुक्तांना केली.

............................................

Web Title: Start a mega vaccination center at Andheri Sports Complex