‘लोकमत व्हीजन एमबीए’ची दिमाखात सुरुवात
By Admin | Updated: March 8, 2015 22:37 IST2015-03-08T22:37:10+5:302015-03-08T22:37:10+5:30
एमबीए अभ्यासक्रमाच्या टअऌ-उएळ 2015 प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘व्हीजन एमबीए २०१५’ आयोजित करण्यात आलेल्या

‘लोकमत व्हीजन एमबीए’ची दिमाखात सुरुवात
मुंबई : एमबीए अभ्यासक्रमाच्या टअऌ-उएळ 2015 प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘व्हीजन एमबीए २०१५’ आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाची दिमाखात सुरुवात झाली. ‘लोकमत’ व ‘कोहिनूर बिझनेस स्कूल’ (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा परिसंवाद बोरीवली येथील गर्जतो मराठी येथे पार पडला. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला.
या परीक्षेत १५० हून अधिक गुण मिळवून मेरिटमध्ये आल्यास पसंतीच्या एमबीए अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. यासाठीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिने ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी पूर्ण तयारी करुन घेण्यासाठी ‘केबीएस’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कोहिनूर बिझनेस स्कूलचे मार्केटिंग हेड ब्रायन डिसूझा यांनी सांगितले.
या परीक्षेत यशस्वी कसे व्हायचे, अधिकाधिक गुण कसे मिळवावेत, लेखी परीक्षेत गुणांची टक्केवारी कशी वाढवावी, व्हर्बल, लॉजिकल रिझनिंग त्याचबरोबर करियर प्लॅनिंग, बी-स्कूलची निवड कशी करावी, कोणते क्षेत्र निवडाल आणि एकंदर प्रवेश प्रक्रियेबाबत या परिसंवादात ‘केबीएस’चे प्राध्यापक संदीप सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच इंडस्ट्री इमर्शन प्रोजेक्ट (आयआयपी) याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच केबीएसचा माजी विद्यार्थी रोहितने या परीक्षेविषयीचे अनुभव कथन केले. शिवाय कोणत्या प्रश्नांना कशाप्रकारे सोडवावे, याविषयीही मार्गदर्शन केले. यावेळी आयडियल क्रेडिअन्सचे प्राध्यापक विवेक सारडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. क्वॉन्टिटेटिव्ह पद्धतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरण्याच्या ट्रिक्स काही उदाहरणांसह त्यांनी दाखवल्या. विद्यार्थ्यांनीही मनातील शंका मार्गदर्शकांना विचारल्या. असा दुहेरी संवाद साधत परिसंवादाचा पहिला दिवस दिमाखात पार पडला. (प्रतिनिधी)