Join us  

वेळापत्रकानुसार लोकल सेवा सुरु करा; वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 9:32 PM

पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सुरु झालेली आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या वेळेवर लोकल येत नाही. त्यामुळे त्यांची अडचण होत आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे,वैतरणा येथून बोरिवली, अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भागवती हॉस्पिटल बोरिवली, ओशिवारा कूपर, नायर, के. एम सायन अशा अनेक रुग्णालयातील ३०० डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, अशा अत्यावश्यक सेवांसाठी दररोज प्रवास करीत असताना, मात्र त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय होते. 

पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोडवरून चर्चगेट दिशेकडे जाण्यासाठी पहाटे ५, सकाळी ११.३० आणि सायंकाळी ६.१० वाजता लोकल सोडण्यात यावी. तर परतीचा प्रवास करण्यासाठी बोरिवलीवरून सकाळी ७.३८,दुपारी २.३० आणि रात्री ९.१० वाजता डहाणूसाठी लोकल सेवा असावी, अशी मागणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :लोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस