Join us  

महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिक सुरू करा; डॉ. दीपक सावंत यांची एकनाथ शिंदेंना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Published: April 17, 2023 1:28 PM

आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई- राज्यात अनेक ठिकाणी पारा हा ४० ते ४२ डिग्रीच्या आसपास आहे.त्यामुळे उष्माघाता पासून नागरिकांचा बचाव होण्यासाठीमहाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,दवाखान्यात सन स्ट्रोक क्लिनीक सुरू करा अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री व शिंदे गटाचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यापूर्वी ही अशा प्रकारची क्लिनिक सुरू केली होती असे त्यांनी सांगितले. आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या एकंदर वाढते तापमान पाहाता उष्माघात क्लिनिक सुरू करताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे वेगवेगळ्या माध्यमातून माहिती द्यावी.तसेच वाढता तापमानाचा पारा लक्षात घेता नागरिकांनी  दुपारी १२ ते ४ यावेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, डोक्यावर टोपी, रूमाल बांधावा , पाणी सरबत थोड्या थोड्या वेळाने पिणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्य शासनाच्या प्रसिध्दी पत्रकामार्फत राज्यातील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे मत .डॉदीपक सावंत यांनी व्यक्त केले.

 विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा  कोकण येथे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे , या क्लिनिक मधल्या स्टाफला विशेष ट्रेनिंग द्यावे. उष्माघात आणि त्यापासून होणारे मृत्यू  हे रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईत आपला दवाखाना व हेल्थ पोस्ट वर प्राथमिक उपचार करून क्रिटीकल पेशन्टना महानगर पालिका रूग्णालयात पाठवल्यास  महानगर पालीका रूग्णालयांना सोपे जाईल.अशीही सूचना  त्यांनी केली.

टॅग्स :एकनाथ शिंदेदीपक सावंतमहाराष्ट्र सरकार