जमीन हेराफेरीच्या सुनावणीस सुरुवात
By Admin | Updated: February 12, 2015 22:45 IST2015-02-12T22:45:44+5:302015-02-12T22:45:44+5:30
वसई तहसिलदार कार्यालयातर्फे जमिनीच्या हेराफेरीप्रकरणी सुनावणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या

जमीन हेराफेरीच्या सुनावणीस सुरुवात
वसई : वसई तहसिलदार कार्यालयातर्फे जमिनीच्या हेराफेरीप्रकरणी सुनावणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या सुनावणीसाठी जवळपास शेकडो शेतकरी वसई तहसिलदार कार्यालयात येत आहेत. याअंतर्गत सुमारे १५ हजार २२२ प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले.
महसूल विभागातर्फे जमीनींच्या दस्तऐवजाची तपासणी केली असता सुमारे १५ हजार २२२ प्रकरणात जमिनीच्या सातबारा उताऱ्यातील खाडाखोड, क्षेत्र वाढवणे, असे प्रकार आढळले. त्यानंतर संबंधीत सातबाराधारक शेतकऱ्यांना महसूल विभागातर्फे नोटीसा बजावण्यात आल्या. आकारबंदमध्ये क्षेत्र कमी असताना सातबाऱ्यावर क्षेत्र कसे वाढले याबाबतचा तपास शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन करण्यात येत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५७ अन्वये पुनर्विलोकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)