शहरात मोफत वाय फाय सुविधा सुरू

By Admin | Updated: August 26, 2014 01:03 IST2014-08-26T01:03:04+5:302014-08-26T01:03:04+5:30

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणारा नवी मुंबईतही आता वाय फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे

Start the free Wi-Fi facility in the city | शहरात मोफत वाय फाय सुविधा सुरू

शहरात मोफत वाय फाय सुविधा सुरू

नवी मुंबई: माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणारा नवी मुंबईतही आता वाय फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आजपासून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कोपरखैरणे आणि वाशी स्थानक परिसरात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तरुणाई आणि चाकरमान्यांनी या सेवेचे स्वागत केले आहे.
शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक प्रकल्प उभारले आहेत. आयटी उद्योगाचे येथे जाळे विणले आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर सिटीतही मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करावी, अशी शहरातील चाकरमानी आणि तरुणाईची मागणी होती.
आमदार संदीप नाईक यांनी सदर बाब पालकमंत्री नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच शहरात वाय फाय सुविधा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून शहरात मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नवी मुंबईसह मुंबई व राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध कामासाठी शहरात येणारे नागरिक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी वर्गाला या सेवेचा लाभ होईल, असा विश्वास पालकमंत्री नाईक यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सध्या वाशी आणि कोपरखैरणे या दोन स्थानकात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात संपूर्ण शहरात ही सेवा
सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या सेवेचा वापर करताना त्याचा कोणी गैरवापर करू नये, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले आहे. तर आगामी काळात नवी मुंबईकरांना रिलायन्सची फोरजी सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Start the free Wi-Fi facility in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.