अनधिकृत होर्डिंग हटविण्यास सुरुवात
By Admin | Updated: September 29, 2014 03:12 IST2014-09-29T03:12:06+5:302014-09-29T03:12:06+5:30
नवरात्री उत्सवाच्या नावाखाली शहरात सुरू असलेल्या अनधिकृत होर्डिंगविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले

अनधिकृत होर्डिंग हटविण्यास सुरुवात
नवी मुंबई: नवरात्री उत्सवाच्या नावाखाली शहरात सुरू असलेल्या अनधिकृत होर्डिंगविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रविवारी शहरातील अनधिकृत होर्डिंग पालिकेकडून हटविण्यात आले.
महापालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवार असूनही नेरूळ परिसरामधील होर्डिंग हटविले. तर काही मंडळांनी स्वागत कमानीवरील पदाधिकाऱ्यांचे फोटो झाकले. (प्रतिनिधी)