Join us  

आरशासमोर उभे राहा, पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 6:01 AM

बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हापूर : मुख्यमंत्री भविष्य सांगण्यातही चुकत आहेत. आधी त्यांनी राज्यात विरोधी पक्षच राहणार नाहीत, असे सांगितले. आता वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता असेल, असे सांगत आहेत. आरशासमोर उभे राहा, म्हणजे पुढचा विरोधी पक्षनेता कोण असेल ते स्वत:लाच दिसेल, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते कोल्हापुरात काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री आघाडीचाच होईल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असेही थोरात यांनी ठणकावले. काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सपा, बसपा, शेकाप, आरपीआय या धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना या आघाडीत सामावून घेतले जाणार आहे. त्यांना सन्मानपूर्वक जागा वाटपही होणार आहे. ‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने चर्चा सुरू आहेत. त्यात यश येईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

खर्गे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांना ईडी, आयकरची भीती घातली जात आहे; पण कितीही घाबरवले तरी काँग्रेस घाबरणार नाही. कमकुवत नेतेच जात आहेत. जे काँग्रेसच्या विचारांशी बांधील आहेत ते कधीही पक्ष सोडणार नाहीत. गुन्हा केला असेल तर कायद्याने त्याची शिक्षा होईलच; पण त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भीती दाखवण्याची गरज नाही. उमेदवारी यादी लांबवली जाणार नाही. तातडीने उमेदवार घोषित करून प्रचाराला लागण्याचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.मंगळवारी मुंबईत बैठक जागा वाटपाचा फॉर्म्युला बºयापैकी निश्चित झाला आहे. ज्या काही जागांवरून वाद आहे, त्याबाबतीत मंगळवारी मुंबईतील बैठकीत निर्णय होऊन तातडीने उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे थोरात म्हणाले.

विधानपरिषदेच्या आमदारांना विधानसभेचे तिकीट नाहीविधानपरिषदेत प्रतिनिधित्व करीत असलेल्या आमदारांना विधानसभेचे तिकीट द्यायचे की नाही यासंदर्भात छाननी समिती गांभीर्याने विचार करीत आहे. विधान परिषदेतील संख्याबळ टिकविणेही गरजेचे आहे, असे थोरात म्हणाले. 

टॅग्स :काँग्रेसआ. बाळासाहेब थोरातदेवेंद्र फडणवीस