दादर स्थानकात स्टॉलला आग
By Admin | Updated: May 27, 2014 05:27 IST2014-05-27T05:27:36+5:302014-05-27T05:27:36+5:30
पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील एका ज्यूस सेंटर स्टॉलला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली

दादर स्थानकात स्टॉलला आग
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील एका ज्यूस सेंटर स्टॉलला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे लोकल सेवेवर थोडा परिणाम झाला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माटुंग्याच्या दिशेने असलेल्या या सेंटरला अचानक आग लागली. ही आग लागताच या स्टॉलमधील कामगारांची एकच पळापळ झाली. आग स्टॉलच्या वरील बाजूस लागली होती. कामगारांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकतच होती. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग २० मिनिटांत विझवण्यात आली. या आगीचा कुठलाही परिणाम रेल्वे सेवेवर झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र लोकल दादर ते माटुंगा दरम्यान बराच वेळ थांबून पुढे जात होत्या, असे सूत्रांनी सांगितले.