डोंबिवलीत इमारतीला तडे

By Admin | Updated: August 10, 2014 01:50 IST2014-08-10T01:50:10+5:302014-08-10T01:50:10+5:30

कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

Stack up to Dombivli | डोंबिवलीत इमारतीला तडे

डोंबिवलीत इमारतीला तडे

>डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच शनिवारी डोंबिवलीतील नामदेव पाटीलवाडी येथील बिल्वदल नामक इमारतीला तडे गेल्याने त्या इमारतीमधील 48 कुटुंबांचे नजीक असलेल्या महापालिकेच्या आचार्य भिसे गुरुजी शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. या इमारतीची स्ट्रक्चरल ऑडिटरमार्फत तपासणी सुरू करण्यात आली असून, ती राहण्यायोग्य आहे की नाही? यासंदर्भातला अहवाल रविवार दुपार्पयत दिला जाणार आहे. 
सुमारे 3क् वर्षापूर्वीच्या या इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरातील कॉलमला तडे गेल्याचे दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आले. रहिवाशांनी  याची माहिती केडीएमसीच्या आपत्कालीन पथक आणि अग्निशामक विभागाला दिली. स्थानिक नगरसेविका सारिका चव्हाण, सुदेश चुडनाईक, उपमहापौर राहुल दामले, माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यासह आपत्कालीन विभागाचे अधिकारी अनिल लाड आणि फ प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीतील सर्व कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले. तडे गेल्याने धोकादायक बनलेल्या या इमारतीभोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशिवाय अन्य नागरिकांना या ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये या इमारतीचा समावेश नाही. दोन वर्षापूर्वीच तिची दुरुस्ती करण्यात आली होती. दरम्यान, आता या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आले असून, यासंदर्भातला अहवाल उद्या दुपार्पयत 
दिला जाणार आहे. तो येईर्पयत रहिवाशांनी भिसे  शाळेत तात्पुरते स्थलांतर करावे, 
अशी विनंती उपमहापौर दामले यांनी रहिवाशांना केली. (प्रतिनिधी) 

Web Title: Stack up to Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.