एसटीचे थांबे वाढणार; प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 06:07 IST2019-05-27T06:07:31+5:302019-05-27T06:07:33+5:30

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ जादा एसटी थांबे उभारणार आहे.

ST stops stops; Relieve the passengers | एसटीचे थांबे वाढणार; प्रवाशांना दिलासा

एसटीचे थांबे वाढणार; प्रवाशांना दिलासा

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ जादा एसटी थांबे उभारणार आहे. जादा थांबे उभारल्यास गणेशोत्सवासह इतर काळात थांब्यांवर होणारी गर्दी विभाजित होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
शीव रुग्णालय, वाशी महामार्ग, सीबीडी बेलापूर, खारघर या ठिकाणी नव्या एसटी थांब्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या थांब्यांवर पाणी, आसनव्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाने नुकताच घेऊन यासाठी ९ लाख ३० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: ST stops stops; Relieve the passengers