खड्ड्यांमुळे पालघरमध्ये एस.टी बंद
By Admin | Updated: September 25, 2014 00:13 IST2014-09-25T00:13:15+5:302014-09-25T00:13:15+5:30
पालघर जिल्हा पुर्व भागात निहे पालघर एस.टी बस रस्त्यावर पडलेले खड्ड्यामुळे बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत

खड्ड्यांमुळे पालघरमध्ये एस.टी बंद
मनोर : पालघर जिल्हा पुर्व भागात निहे पालघर एस.टी बस रस्त्यावर पडलेले खड्ड्यामुळे बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. त्यांना सध्या पायी प्रवास करून मनोर-पालघर मुख्य रस्त्यावर येवून वाहन पकडावे लागत आहे.
मासवण ते नीहे पर्यंत अंतर ९ कि. मी. येत असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने पालघर एस.टी महामंडळाने गेल्या चार दिवसापासून पालघर निहे बस बंद केली आहे. त्यामुळे काटाळे, बोहरे, मासण, निहे, नागझरी परीसरातील इतर गावपाड्यातील आदिवासी कुणबी, वंजारी, कातकरी, समाजातील विद्यार्थी, नोकरदारी वर्ग, महिला वर्ग तसेच वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहे. शाळकरी विद्यार्थी व नोकरदार वगाला पायी प्रवास करून मुख्य रस्त्यावर येवून एस.टी बस किंवा इतर वाहने पकडून जावे लागत आहे. आज पर्यंत मासवण ते निहे नागझरी रस्त्याला विविध योजना अंतर्गत कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहे. रस्त्याचे दुरूस्तीसाठी, सर्व पक्षीय, नागरीकांनी मनोर, पालघर मुख्य रस्त्यावर रास्ता रोकोही केला होता. परंतु, त्याचीही दखल घेतली गेली नाही. लाखो रुपये खर्चकरुनही रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहे. नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याने शासनाचे कोट्यावधी रू. प्रत्येक वर्ष पाण्यात जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना व नोकरदारी वर्गाला तसेच पायी प्रवास करावा लागतो.