एसआरए हद्दीत आढळल्या ३ हजार २९३ ठिकाणी झोपड्या
By Admin | Updated: November 18, 2015 03:02 IST2015-11-18T03:02:44+5:302015-11-18T03:02:44+5:30
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाच्या (एसआरए) स्थापनेनंतर प्रशासनाने प्रथमच शहर आणि उपनगरातील झोपडपट्यांच्या माहितीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. २0१२ च्या जीआयएस

एसआरए हद्दीत आढळल्या ३ हजार २९३ ठिकाणी झोपड्या
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाच्या (एसआरए) स्थापनेनंतर प्रशासनाने प्रथमच शहर आणि उपनगरातील झोपडपट्यांच्या माहितीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. २0१२ च्या जीआयएस सॅटेलाईट इमेजची मदत घेतल्याने एसआरए हद्दीत ३ हजार २९३ ठिकाणी झोपड्या असल्याचे, निदर्शनास आले आहे. त्यानुसार झोपड्यांच्या बाहेरील हद्दीचे सीमांकन ठरविण्यासाठी जीपीएस तंत्रप्रणालीद्वारे टोपोग्रोफीकल सर्व्हे करण्याचे काम एसआरएने हाती घेतले आहे.
शहर आणि उपनगरामध्ये झोपडपट्यांमध्ये एसआरए योजना राबविण्यासाठी अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. परंतु या योजना वेळेत पूर्ण होत नाहीत. या योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी एसआरएने मंजूरी दिलेल्या योजनांच्या बाहेरील जागांचा जीपीएस/ईटीएस या प्रभावी तंत्राद्वारे सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसआरए रहिवाशांच्या मान्यतेनुसार विकासकांना प्रकल्प राबविण्यास मान्यता देते. परंतु काही ठिकाणी रहिवाशांच्या विरोधामुळे एसआरए प्रकल्प राबविण्यात येत नाहीत. त्यामुळे एसआरएच्या इमारती कशाही उभ्या राहतात. त्यामुळे एसआरएच्या इमारती चौकोनी आकाराच्या आणि झोपड्यांचा सेक्टरनुसार विकास शक्य आहे काय याचा विचार एसआरए करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.