संक्रांतीच्या खरेदीला उधाण
By Admin | Updated: January 15, 2015 02:06 IST2015-01-15T02:06:03+5:302015-01-15T02:06:03+5:30
तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश देणारा मकरसंक्रातीच्या खरेदीसाठी सर्वांचीच धावपळ सुरू आहे.

संक्रांतीच्या खरेदीला उधाण
नवी मुंबई : तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश देणारा मकरसंक्रातीच्या खरेदीसाठी सर्वांचीच धावपळ सुरू आहे.
तुर्भेतील एपीएमसी मार्केट, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, नेरूळ येथील किरकोळ बाजारपेठा सजल्या आहेत. तीळगुळ, तिळाचे तयार लाडू, हळदी- कुंकू समारंभातील वाण आदि साहित्यांच्या खरेदीमध्ये महिलावर्ग मग्न झाला आहे. बाजारात तिळाचे लाडू आणि तीळगुळाचे दर १६० ते २०० रुपये प्रतिकिलो आहेत. त्याचबरोबर पाच - दहा लाडू लहान पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. अनेक ज्वेलर्स आणि इतर दुकानांमध्ये ‘हलव्याचे दागिने’ घेण्यासाठी महिलांची गर्दी आहे. स्टीलची भांडी, जिवनाआवश्यक वस्तू, गृहउपयोगी वस्तू वाण म्हणून देण्याकडे महिलावर्गाचा अधिक कल आहे.