समुद्राला उधाण भरती
By Admin | Updated: May 15, 2015 23:02 IST2015-05-15T23:02:43+5:302015-05-15T23:02:43+5:30
मान्सूनचे नैऋत्य मोसमी वारे समुद्रात जोरदार वाहत असल्याने समुद्र खवळला आहे. मान्सूनचे आगमन १ जूनला अगदी वेळेवर होणार

समुद्राला उधाण भरती
पेण : मान्सूनचे नैऋत्य मोसमी वारे समुद्रात जोरदार वाहत असल्याने समुद्र खवळला आहे. मान्सूनचे आगमन १ जूनला अगदी वेळेवर होणार असल्याने यंदा मान्सून कालावधीत २७ दिवसांची मोठी उधाणभरती येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. या काळात जोरदार पाऊस तथा अतिवृष्टीची शक्यता आहे.
सध्या मान्सूनपूर्व तयारी खरीप हंगाम, पीक योजना व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन या बैठकांचा सिलसिला सर्वत्र सुरू आहे. जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्वच ठिकाणी शासकीय यंत्रणा मान्सून हंगामाबाबत नियोजन करीत आहेत.
खरीप आढावा बैठकांमध्ये खते, बी-बियाणे, कृषी पीक विमा तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठांना उपदेशाचे डोस पाजतात. मात्र अतिवृष्टी, पूरपरिस्थिती कालखंडात ही यंत्रणा पार कोलमडते. याबाबत योग्य नियोजनासाठी जिल्हा, तालुकास्तरावर धावपळ सुरू झाली आहे. (वार्ताहर)