शामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST2021-07-12T04:04:48+5:302021-07-12T04:04:48+5:30

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शामनगर येथील प्रसिद्ध असलेल्या शामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा ...

Spontaneous participation of women and youth in Raja Blood Donation Camp of Shamnagar | शामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

शामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शामनगर येथील प्रसिद्ध असलेल्या शामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यात रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महात्मा गांधी रक्तपेढी, वांद्रे पश्चिम यांच्या सहकार्याने शामनगरचा राजा गणेश मंडपात आज सायंकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रात्री नऊपर्यंत २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले

गेले १५ दिवस मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, उपाध्यक्ष नरेश परब, विजय वंजारे, स्मिता सावंत, वैशाली भिंगार्डे, खजिनदार रमेश पाटील, सरचिटणीस सुदेश धुरी, उत्सव समिती अध्यक्ष शिवाजी खैरनार, तसेच कार्यकर्ते, महिला मंडळ अहोरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र होते.

फोटो ओळ : श्यामनगरचा राजा आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी विजय वंजारे, स्मिता सावंत, प्राजक्ता महाजन, अध्यक्ष दशरथ मोरे, स्मिता भिंगार्डे, शिवाजी खैरनार आदी.

Web Title: Spontaneous participation of women and youth in Raja Blood Donation Camp of Shamnagar