Join us  

एसआरएतील सदनिकांचे क्षेत्रफळ पाचशे चौरस फूट करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:23 AM

मंत्री अस्लम शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबईत झोपडपट्टी विकास प्राधिकरण(एसआरए) योजनेंतर्गत मिळणाऱ्या सदनिकांचे क्षेत्रफळ पाचशे चौरस फूट करा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. त्यासाठी एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मोठ्या कुटुंबातील सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.

एसआरए योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणाºया सदनिका किंवा त्याहून अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना अपुरी पडत आहे. पात्र झोपडपट्टीधारकांना देण्यात येणाºया सदनिकांचे क्षेत्रफळ वाढवून पाचशे चौरस फूट करण्यात येईल, असे काँग्रेस(आय)ने निवडणुकीदरम्यान त्यांच्या वचननाम्यात म्हटले होते. यासाठी अन्य मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे पाचशे चौरस फूट सदनिका देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. ‘एसआरए योजनेंतर्गत सदनिका जर पाचशे चौरस फुटांच्या दिल्या तर झोपडपट्टीधारकांचे राहणीमान उंचावून त्यांना हक्काची मोठी जागा मिळेल,’ असे शेख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रस्तावाबाबत काय उत्तर देतात त्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरे