शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च

By Admin | Updated: August 24, 2014 01:59 IST2014-08-24T01:59:12+5:302014-08-24T01:59:12+5:30

कुंपण व सुरक्षा भिंत घालण्यासाठी तसेच तेथे सुरक्षा चौकी उभारण्यासाठी 15 लाख 41 हजार रूपये खर्च केल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली़

Spending Rs 15 lakhs on Shakti Mill | शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च

शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च

 मुंबई : सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांनी चर्चेत आलेल्या शक्ती मिलला तारेचे कुंपण व सुरक्षा भिंत घालण्यासाठी तसेच तेथे सुरक्षा चौकी उभारण्यासाठी 15 लाख 41 हजार रूपये खर्च केल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली़ 

या मिलच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आह़े त्यामुळे न्यायालयाने यावर प्रशासक नेमला आह़े न्यायालयाने या मिलमधील कचरा व गवत काढण्याचे तसेच येथे सुरक्षेचे उपाय योजण्याचे आदेश शासनाला दिले होत़े त्यानुसार यासाठी खर्च करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील शासनाने न्यायालयाला दिला़ (प्रतिनिधी)

Web Title: Spending Rs 15 lakhs on Shakti Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.