Join us  

शरद पवारांच्या भाषणात रिकाम्या खुर्च्या, कंटाळलेल्या लोकांनी घर गाठल्याची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 9:30 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोलमैदान येथे पवारांची सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचं आयोजन केलं होतं.

ठाणे - केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची सभा तब्बल 2 तास उशिराने सुरू झाल्याने त्यांच्या सभेतून लोकांनी काढता पाय घेतला. अगोदरच काही नेत्यांची भाषणं झाली होती. त्यानंतर, 7.30 वाजता सुरू होणारे पवारांचे भाषण रात्री 9 वाजता सुरू झाले. पवारांचे भाषणही लांबतच गेल्याने लोकांनी भाषणाकडे पाठ फिरवत घरचा रस्ता धरला. त्यामुळे सभास्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्याचे चित्र दिसले. याबाबत स्थानिक लोकांकडू जोमानं चर्चाही होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोलमैदान येथे पवारांची सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. तर, गणेश नाईक, संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव आदी नेतेही सभेला उपस्थित होते. वास्तविक पाहता 7.30 वाजता पवारांच्या भाषणाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, रात्री 9.00 वाजत पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच नागरिकांनी सभेला येण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यातच, मधल्या वेळेत स्थानिक नेत्यांनी भाषणंही झाली. त्यामुळेही लोकांमधील उत्साह मावळला होता. आधीच कंटाळलेल्या लोकांनी रात्री उशिरा सुरू झालेल्या पवार यांच्या लांबत चाललेल्या भाषणाकडे पाठ फिरवली. लोकांनी या सभेतून काढता पाय घेतल्यानं सभास्थळी रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे आयोजकांवर नामुष्कीची वेळ आली. 

दरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात रस्ते, धरणे, कारखाने उभारले गेले. तर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशाचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करून देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येकाच्या हातात जो मोबाइल दिसत आहे, तो केवळ राजीव गांधी यांनी केलेल्या प्रगतीमुळेच, असे म्हणत पवार यांनी या सभेत मोदींवर टीका केली. तसेच गांधी घराण्यावर बोलण्याचा मोदींना अधिकार नाही, असेही मोदी म्हणाले.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमुंबई