Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोलणी निष्फळ, संप सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:43 IST

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व संपकरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही.

मुंबई : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व संपकरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे तिसºया दिवशीही संप सुरू राहणार आहे. दुसºया दिवशी कामकाज ठप्प झाले, तर रुग्णालयात रुग्णांचे हाल झाले.राजभवनावर झालेल्या बैठकीत सातवा वेतन आयोग नोव्हेंबरपासून लागू करताना तो वेतन निश्चितीसह (पे फिक्सेशन) द्यावा, जानेवारी २०१८ मध्ये केंद्राने दिलेली महागाई भत्त्याची वाढ मिळालेली नाही. त्यासाठी वाढीव ६०० कोटींची तरतूद करावी व १४ महिन्यांची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी तर जानेवारीची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी कर्मचाºयांच्या नेत्यांनीकेली. त्यावर नोव्हेंबरमध्ये वेतन आयोग लागू केला जाईल, असे आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिले. कर्मचारी नेते विश्वास काटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोणतेही ठोस आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिले नाही. संप मागे घेण्याचे आवाहनही केले नाही.

टॅग्स :सरकारसुधीर मुनगंटीवार