सातिवलीत सापडलेली स्फोटके आरडीएक्स ?

By admin | Published: October 30, 2016 01:51 AM2016-10-30T01:51:00+5:302016-10-30T01:51:00+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे सापडलेली स्फोटके आरडीएक्सच असून त्याद्वारे बॉम्ब बनवून दहशतवादी कारवाया करण्याचा दहशतवादी गटाचा प्रयत्न असावा, असा

Spectacular explosives RDX? | सातिवलीत सापडलेली स्फोटके आरडीएक्स ?

सातिवलीत सापडलेली स्फोटके आरडीएक्स ?

Next

- हितेन नाईक /आरिफ पटेल,  पालघर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे सापडलेली स्फोटके आरडीएक्सच असून त्याद्वारे बॉम्ब बनवून दहशतवादी कारवाया करण्याचा दहशतवादी गटाचा प्रयत्न असावा, असा तर्क पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याचे कनेक्शन आयएसआयशी असल्याचेही सांगितले जात असून पालघर तालुक्यातील कोरे ते मथानेदरम्यानच्या पाच पोलीस लॅण्डिंग पॉइंटजवळूनच हे आरडीएक्स सातिवलीच्या गोदामापर्यंत पोहोचवले गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस लॅण्डिंग पॉइंट वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबईच्या काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत मुंबई-अहमदाबाद रस्त्यावर सातिवलीनजीक निर्जन जागेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीमध्ये आरडीएक्सचा १४ ते १५ किलोचा साठा विविध ठिकाणी पुरून ठेवलेला सापडला. दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोपनीयतेने व नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवण्यात आली.
हे आरडीएक्स छोटछोट्या पाकिटांमध्ये आढळून आले असले, तरी यातील काही पाकिटे उघडलेली असल्याने बॉम्ब बनवण्याचे काम सुरू असावे का, यासारख्या प्रश्नांनी पोलिसांची चिंता वाढलेली आहे. हे आरडीएक्स बॉम्ब बनवण्यासाठी नेण्यात आले असावे, अशी पोलिसांना भीती आहे. वसईहून पुढे सफाळे, एडवन, कोरे दातिवरे, उसरणी, मथाने आदी समुद्रकिनाऱ्यांवरून हा माल सातिवली येथे आणण्यात आला असावा, अशी पोलिसांना शंका आहे.

स्थानिक पोलिसांना तपासापासून दूर ठेवले
दहशतवादी गटांकडून दिवाळीदरम्यान मुंबई व सुरत येथे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दहशतवादविरोधी पथकाचे सर्वात विश्वासू अधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्याकडे या तपासाची सूत्रे सोपवली.
त्यानुसार, त्या पथकाने संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतल्यानंतर स्फोटकांसंबंधी माहिती मिळाली. मात्र, स्थानिक जिल्हा पोलिसांना याची उशिराने माहिती देण्यात आली. किंबहुना, या यंत्रणांना तपासापासून दूर ठेवण्यात आल्याचे समजते.

स्फोटके फॉरेन्सिक लॅबकडे
गुरुवारी सापडलेली स्फोटके फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी एक्स्पोजिंग सबस्टन्सनेस अ‍ॅक्ट कलम ४ व ५ तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला या साठ्याची खबर न लागल्याने युनिटचे हे अपयश मानले जात ाहे.

लॅण्डिंग पॉइंट नावापुरते ?
या कारवाईनंतर पालघरमध्ये पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात स्फोटकाच्या साठ्याबाबतीतही चर्चा झाली. पालघर जिल्ह्यात कोरे, दातिवरे, एडवन, उसरणी, मथाने, केळवे (दांडापाडा), केळवेगाव, दादर पाडा, माहीम टेंभी, वडराई, उसबाव (शिरगाव), सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नांदगाव, नवापूर, दांडी-उच्छेली, तारापूर, कंबोडा, घिवली, डहाणू, बाडी किनाऱ्यांवर लॅण्डिंग पॉइंट आहेत. मात्र, कमी मनुष्यबळामुळे ते नावापुरते आहेत.

Web Title: Spectacular explosives RDX?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.