केसीत मीडियाच्या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यशाळा

By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:28+5:302014-08-25T21:40:28+5:30

हॅलो....किंवा युवागिरीसाठी...

Special workshops for students of KCit Media | केसीत मीडियाच्या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यशाळा

केसीत मीडियाच्या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यशाळा

लो....किंवा युवागिरीसाठी...

केसीत मीडियाच्या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यशाळा
मुंबई:
मीडियात उत्तम करिअर करायचे असल्यास पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकांची देखील गरज असते. यासाठी कुलाबा येथील किशिनचंद छेलाराम (केसी) महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाने पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला. प्रसिद्ध मान्यवर व्यक्तींकडून केसीसह इतर महाविद्यालयाच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांनादेखील या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
पब्लिक रिलेशन, जाहिरात, पत्रकारिता, कॉपिराइट, चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफी या विषयांवर त्या-त्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रसिद्ध कॉपिरायटर सायरस दारूवाला यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधत कॉपी राईिटंग क्षेत्रातील कामाविषयी माहिती दिली. याचबरोबर त्यांनी अनुभव सांगत खेळाच्या माध्यमातून याविषयी सांगितले. यात त्यांनी स्वत:ची एका ओळीत ओळख करून द्यावयास सांगितले. कमीत कमी शब्दात आपला मुद्दा योग्य पद्धतीने मांडता येण्याचे कौशल्य कसे विकसित करावे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
चित्रपट आणि फोटोग्राफी (फिल्म ॲण्ड फोटोग्राफी) विषयावर तुनाली मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना लहानमुलांची तस्करी (चाइल्ड ट्रॅफिकिंग) आशयाचा चित्रपट दाखवला. याद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये कोण-कोणती कौशल्ये गरजेची आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. कोणत्या बाबी लक्षात घेऊन चित्रपट तयार केला जातो, याविषयी माहिती त्यांनी दिली.
जनसंपर्क (पीआर) याविषयावर अंजली तलरेजा यांनी या क्षेत्रात असलेल्या समस्यांविषयी माहिती दिली. एखाद्या व्यक्तीच्या समाजातील व्यक्तिमत्त्वाची छाप त्याच्या जनसंपर्कावरून ठरतेे. एक जनसंपर्क अधिकारीच त्याचे व्यक्तिमत्त्व उंचावू अथवा घटवू शकते याविषयी तलरेजा यांनी मार्गदर्शन केले. अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेचा लाभ घेतल्याचे मास मीडियाच्या विभागाच्या प्रमुख मंजुला श्रीनिवास यांनी सांगितले.
.............................................................................

Web Title: Special workshops for students of KCit Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.