‘बकरी ईद’साठी पोलिसांचे विशेष व्हॉट्सअॅप
By Admin | Updated: September 24, 2015 00:54 IST2015-09-24T00:54:43+5:302015-09-24T00:54:43+5:30
मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त एक विशेष व्हॉट्सअॅपनंबर पोलिसांकडून देण्यात आला आहे. ज्यात या सणादरम्यान नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत तक्रारी

‘बकरी ईद’साठी पोलिसांचे विशेष व्हॉट्सअॅप
गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त एक विशेष व्हॉट्सअॅपनंबर पोलिसांकडून देण्यात आला आहे. ज्यात या सणादरम्यान नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत तक्रारी असल्यास त्या पोलिसांना कळविता येतील.
गुरुवारी मुंबईत बकरी ईद सण साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सणाची तयारीदेखील जोरात सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाचीही धूम आहे. त्यात गर्दीचा फायदा उचलून समाजकंटकांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या पाचही परिमंडळांना एक विशेष क्रमांक देऊन त्यामार्फत नागरिकांनी तक्रारी कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. हे सर्व क्रमांक संबंधित अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली असतील.
या क्रमांकाचे नियंत्रण सेन्ट्रल रूम आॅफिसर (सीआरओ) मार्फत केले जाणार आहे. येणाऱ्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचविण्याचे काम हा अधिकारी करणार आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे, हा या मागील उद्देश आहे. हा क्रमांक निव्वळ बकरी ईदपुरताच मर्यादित आहे. ईदनंतर हा क्रमांक डिअॅक्टिव्हेट करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.