मुंबई - गोरखपूरदरम्यान विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST2021-06-16T04:08:34+5:302021-06-16T04:08:34+5:30

मुंबई : रेल्वेने मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडी गोरखपूर येथून बुधवार १६ ...

Special trains between Mumbai and Gorakhpur | मुंबई - गोरखपूरदरम्यान विशेष गाड्या

मुंबई - गोरखपूरदरम्यान विशेष गाड्या

मुंबई : रेल्वेने मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडी गोरखपूर येथून बुधवार १६ जूनला १९.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल. येथून ती शुक्रवार १८ जूनला ०७.५० वाजता सुटेल.

-------------------------------------

साप्ताहिक विशेष अतिजलद गाड्या

मुंबई : रेल्वेने साप्ताहिक विशेष अतिजलद गाड्यांच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. विशेष अतिजलद साईनगर शिर्डी येथून १९ जून आणि २६ जूनला १४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हावडा येथे १९.३० वाजता पोहोचेल. हावडा येथून १७ जून, २४ जूनला १४.३५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी १९.१० वाजता पोहोचेल.

------------------------------

मुंबई - नागपूर दुरांतो झाली पूर्ववत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर दुरांतो विशेष १६ जूनपासून पूर्ववत करण्यात येत आहे. दुरांतो विशेषच्या पूर्ववत झालेल्या फेऱ्यांसाठीचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवसाची परवानगी असेल.

--------------------------------------

Web Title: Special trains between Mumbai and Gorakhpur