Join us

होळीच्या निमित्ताने मुंबई मेट्रोचे विशेष वेळापत्रक

By सचिन लुंगसे | Updated: March 6, 2023 21:49 IST

आरामदायी आणि अखंड प्रवास करता यावा यासाठी विशेष वेळापत्रक

मुंबई : ७ मार्च रोजी मुंबईमेट्रो मार्ग २अ आणि ७ हे प्रवाशांच्या सेवेत अखंड कार्यान्वित असणार आहेत. होळी सणाच्या दिवशी मुंबईकरांच्या प्रवासाची गरज लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मेट्रो सेवा ही नियमित वेळेपेक्षा सकाळी १५ मिनिटांच्या अंतराने तर दुपारी २:०० वाजल्यापासून १० मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. मेट्रो सेवेच्या प्रारंभिची आणि समाप्तीची वेळ ही इतर दिवसांप्रमाणेच असणार आहे. 

महा मुंबई मेट्रो मुंबईकरांना सणासुदीच्या काळात नेहमीप्रमाणे आरामदायी आणि अखंड प्रवास करता यावा यासाठी विशेष वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मुंबईकरांचा प्रवास ह सुरळीत आणि त्रासमुक्त करण्यासाठी सर्व आवश्यकत्या उपाययोजना आम्ही नेहमी करत राहू, असे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

 

टॅग्स :मुंबईमेट्रो