क्लासिफाइड डेपोंचा ‘लोकमत’तर्फे विशेष गौरव

By Admin | Updated: September 16, 2014 01:06 IST2014-09-16T01:06:22+5:302014-09-16T01:06:22+5:30

ऑनलाइन युगात वर्तमानपत्रतील जाहिराती कमी झालेल्या असताना अनेकांना रोजीरोटी मिळवून देणा:या क्लासिफाइड डेपोंचा सत्कार शनिवारी ‘लोकमत’कडून करण्यात आला.

Special pride by classified depopo 'Lokmat' | क्लासिफाइड डेपोंचा ‘लोकमत’तर्फे विशेष गौरव

क्लासिफाइड डेपोंचा ‘लोकमत’तर्फे विशेष गौरव

मुंबई : ऑनलाइन युगात वर्तमानपत्रतील जाहिराती कमी झालेल्या असताना अनेकांना रोजीरोटी मिळवून देणा:या क्लासिफाइड डेपोंचा सत्कार शनिवारी ‘लोकमत’कडून करण्यात आला. चेंबूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जाहिरात क्षेत्रतील क्लासिफाइड डेपो हे जिवापाड मेहनत करून वर्तमानपत्रंना जाहिराती मिळवून देतात. या जाहिरात एजन्सी चालकांचे कौतुक ‘लोकमत’ने केले. शनिवारी चेंबूरच्या एकर्स क्लब येथे हा गुणगौरव सोहळा झाला. या वेळी लोकमत समूहाचे सहउपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, क्लासिफाइड ग्रुप मॅनेजर चंदन पठारे, विजय पाध्ये, अमोल धर्मे, अविनाश मिस्त्र आणि गिरीश गांधी  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली. या वेळी मुंबई, ठाणो, नवी मुंबई आणि रायगड या विभागांत काम करणारे 1क्क् ते 15क् क्लासिफाइड डेपोंचे मालक उपस्थित होते. 
गेल्या वर्षभरात उत्कृष्ट काम करणा:या या क्लासिफाइड डेपोंमधून 25 जणांचा ‘लोकमत’कडून गौरव करण्यात आला. यामध्ये टॉप 5 अंतर्गत पहिला क्रमांक कियोन अॅडव्हर्टायङिांग, दुसरा क्रमांक रियो अॅडव्हर्टायङिांग, तिसरा क्रमांक झलक अॅड्स, चौथा क्रमांक विनम्र अॅडव्हर्टायङिांग आणि पाचवा क्रमांक युनिक पब्लिसिटी या जाहिरात डेपोंनी पटकावला. तर आर्यन अॅडव्हर्टायङिांग, समर्थ अॅडव्हर्टायङिांग, हर्षिता अॅडव्हर्टायङिांग, पवन पब्लिसिटी, श्री सद्गुरू पब्लिसिटी, अंजता पब्लिसिटी, अॅड जंक्शन, श्री स्वामी समर्थ अॅडव्हर्टायङिांग, जोया क्रिएशन्स, जीत पब्लिसिटी, अंबाजी अॅडव्हर्टायङिांग, एक्स्प्रेस अॅडव्हर्टायङिांग, फलकॉन मल्टीमीडिया, झोडियाक अॅडव्हर्टायझर्स, ओनस अॅडव्हर्टायङिांग, सावंत अॅडव्हर्टायङिांग, सिद्धिविनायक अॅडव्हर्टायङिांग, मिलिनियम अॅडव्हर्टायङिांग एजन्सी, मयूरेश पब्लिसिटी आणि बाबा पब्लिसिटी 
या डेपोंचादेखील मानचिन्ह 
आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Special pride by classified depopo 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.