Join us

"मालिक आपको तंदुरुस्त रखे"; अजमेर शरीफच्या दर्ग्यात राज ठाकरेंसाठी दुआ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:52 IST

अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्यासाठी दुआ मागण्यात आली आहे.

मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या हाताला दुखापत झाली आहे. टेनिस खेळताना त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रार्थना करण्यासही सुरुवात केली. 

आता अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्यासाठी दुआ मागण्यात आली आहे. अजमेर शरीफच्या दर्ग्याचे व्यवस्थापक सय्यद फरहद यांनी याबाबतचा एक व्हिडिओच शेअर केला आहे. 

राज ठाकरेंच्या हाताला हेअर लाईन फ्रॅक्चर, टेनिस खेळताना झाली दुखापत

"मला मुंबईहून फोन आला आणि कळलं की तुमच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. मी आता अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात आहे. मी इथं तुमच्यासाठी दुआ करत आहे. मालिक तुम्हाला स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवो. तुम्हाला लवकर बरं करो", असं सय्यद फरहद यांनी म्हटलं आहे. दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याशीही बोलणं झालं त्यावेळीही राज ठाकरे यांचा उल्लेख झाला होता, असंही सय्यद यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

महाराष्ट्राचं व्हिजनला यश मिळोसय्यद फरहद यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या व्हिजनचंही कौतुक केलं. "तुमचं जे महाराष्ट्रासाठीचं व्हिजन आहे. तुमचं जे मिशन आहे त्याला बळ मिळो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा", असंही सय्यद फरहद म्हणाले.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबईमुस्लीम