पनवेलमध्ये ‘स्मार्ट सिटी’साठी विशेष सभा

By Admin | Updated: July 16, 2015 22:56 IST2015-07-16T22:56:32+5:302015-07-16T22:56:32+5:30

स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने तयार केलेल्या योजनेंतर्गत पनवेल शहरही स्मार्ट बनविण्याचा निर्धार नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत

Special meeting for 'smart city' in Panvel | पनवेलमध्ये ‘स्मार्ट सिटी’साठी विशेष सभा

पनवेलमध्ये ‘स्मार्ट सिटी’साठी विशेष सभा

पनवेल : स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने तयार केलेल्या योजनेंतर्गत पनवेल शहरही स्मार्ट बनविण्याचा निर्धार नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. त्यानुसार पाणी, रस्ते, वीज या मूलभूत गरजा पूर्ण करूनच या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विरोधकांनी या सभेत केले.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या शहराला पहिल्या वर्षी साधारण २00 कोटी व पुढील तीन वर्षांत प्रत्येकी १00 कोटी असे ५00 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरेसा पाणीपुरवठा, शाश्वत विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छता, कार्यक्षम नागरी वाहतूक व सार्वजनिक परिवहन, गरिबांसाठी परवडणारी घरे, मजबूत माहिती प्रणाली व डिजिटलायझेशन, उत्तम ई -गव्हर्नन्स प्रशासन, शाश्वत पर्यावरण अशा मूलभूत सुविधांसाठी निधी मिळू शकतो. या योजनेत सहभाग घेण्यासाठी गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विरोधकांनी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्याकडे योजनेबाबत सविस्तर माहितीची मागितली. नगरसेवक लतीफ शेख यांनी केवळ सहभाग घेवून उपयोग नाही तर आपली मानसिकता देखील स्मार्ट बनवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. काही नगरसेवकांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी अनेक चर्चा झाल्यावर अखेर योजनेत हिरवा कंदील मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Special meeting for 'smart city' in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.